चीनच्या २ आस्थापनांनी मानचित्रांवरून इस्रायलचे नाव हटवले !

चीनच्या ‘बायडू’ आणि ‘अली बाबा’ या आस्थापनांनी त्यांच्या संकेतस्थळांवरील मानचित्रातून इस्रायलचे नाव हटवले आहे, असे वृत्त प्रसारित झाले आहे. ‘बायडू’ने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या सीमा दाखवल्या आहेत; मात्र त्यावर या दोघांचीही नावे लिहिण्यात आलेली नाहीत.

मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण माहितीद्वारे पडताळले जाणार !

मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय
शिंदे समितीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला !

हमासचे आक्रमण, हे पंतप्रधान नेतान्याहू यांचे अपयश असल्याचा आरोप

‘तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करायला हवे होते. तुम्ही आम्हा सर्वांना मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहात; पण त्याऐवजी आम्ही तुमचे राजकीय, सुरक्षा, सैनिकी आणि राजनैतिक अपयश सहन करत आहोत.

पुणे येथील नवले पुलाजवळ आंदोलकांनी टायर जाळून वाहतूक रोखली !

मराठा आरक्षणाचे प्रकरण
मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
नागरिकांचे हाल

Arsh Dalla : पंजाबमधील हरजिंदर सिंह या उद्योगपतीच्या हत्येचे धागेदोरे कॅनडापर्यंत पोचले !

कॅनडात रहाणारा कुख्यात गुंड अर्श डल्ला याने त्यांच्या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे.

भारताने पाक आणि चीन सीमेवर तैनात केली ‘एस्-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा !

२ यंत्रणा चीन सीमेवर, तर १ यंत्रणा पाक सीमेवर तैनात करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे.

America New Nuclear Bomb : अमेरिका बनवत आहे हिरोशिमावर टाकलेल्या बाँबपेक्षा २४ पट अधिक शक्तीशाली परमाणु बाँब !

अमेरिकी संरक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यासाठी लागणारा निधी पुरवण्याची प्रक्रियाही चालू करण्यात आली आहे.

बीडमध्ये अनिश्‍चित काळासाठी संचारबंदी आदेश लागू !

बीड येथे प्रत्येक तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरापर्यंत, तसेच जिल्ह्यातील प्रमुख मुख्य महामार्ग येथे संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.

उपोषण सोडा, आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचे आवाहन पत्राद्वारे केले. या पत्रात ठाकरे म्हणाले, ‘‘निगरगट्ट आणि असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जिवाची बाजी लावू नका. उपोषण सोडा.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा !

‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात बाँबस्फोट झाल्याचे प्रकरण
समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका !