मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण माहितीद्वारे पडताळले जाणार !

  • मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय

  • शिंदे समितीचा अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मराठवाड्यातील निझामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्‍चित करणार्‍या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल मंत्रीमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला. ‘कुणबी जाती’ची नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही चालू करण्यात आली असून मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण पडताळण्यासाठी मागासवर्ग आयोग नव्याने माहिती गोळा करणार आहे.

न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड आणि न्या. संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

बैठकीतील इतर निर्णय

  • नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर मर्यादेत साहाय्य करणार.
  • चेंबूरला अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी आयटीआय नांदगाव येथील ‘पीएम मित्रा पार्क’ उभारणीसाठी मुद्रांक नोंदणी शुल्क १०० टक्के सवलत देणार.
  • चिटफंडसंबंधीच्या न्यायालयीन प्रकरणांना वेग येणार. त्यांच्याशी संबंधित कायद्यात सुधारणा करणार.