कडेगाव (सांगली) येथील प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांचे निधन !

कडेगाव-पलूस, जिल्‍हा सांगली येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख (वय ४४ वर्षे) यांचे अल्‍पशा आजाराने निधन झाले. सनातन संस्‍थेच्‍या मलकापूर येथील साधिका सौ. कांतावती देशमुख यांचे ते ज्‍येष्‍ठ चिरंजीव होते.

छत्रपती संभाजीनगर येथे ३०० विद्यार्थ्‍यांनी बनवल्‍या ‘इको फ्रेंडली’ श्री गणेशमूर्ती !

शहरातील ‘साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या नरसिंहपूर साधना पाटील प्राथमिक विद्यालय आणि शहरातील साने गुरुजी माध्‍यमिक विद्यालय येथे ‘इको फ्रेंडली बाप्‍पा बनवा’ (पर्यावरणपूरक) या कार्यशाळा आणि कार्यशाळेत बनवलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे प्रदर्शन नुकतेच त्‍या-त्‍या शाळेच्‍या प्रांगणात पार पडले.

३५ सहस्र ६६ शासकीय पदांसाठी २७ लाखाहून अधिक अर्ज !

तलाठी, जिल्‍हा परिषद आणि आरोग्‍य विभाग या तीन विभागांच्‍या ३५ सहस्र ६६ रिक्‍त जागांसाठी आतापर्यंत सरकारकडे २७ लाख ५ सहस्र ७१३ अर्ज प्राप्‍त झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून २४ डब्‍यांच्‍या गाड्या धावणार

शहर आणि उपनगरे येथे वाढणारी गर्दी लक्षात घेता २४ डब्‍यांची रेल्‍वेगाडी करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

एस्.टी. बसच्‍या स्‍वच्‍छतेच्‍या १० गुणांमध्‍ये मार्गफलक सुस्‍पष्‍ट असण्‍याचाही समावेश !

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्‍वच्‍छ, सुंदर बसस्‍थानक अभियाना’मध्‍ये स्‍वच्‍छ एस्.टी. साठी १० गुण निश्‍चित करण्‍यात आले आहेत.

(म्हणे) ‘रशियाने शांतता निर्माण करून युक्रेनशी संवाद साधावा !’ – जस्टिन ट्रुडो

स्वत:च्या देशात सत्ता आणि अधिकार हाताशी असतांना तेथील हिंदूंची मंदिरे आणि उच्चायुक्तालय यांवरील आक्रमणे रोखून शांतता प्रस्थापित करू न शकणारे ट्रुडो दुसर्‍या देशाला कोणत्या तोंडाने उपदेश करतात ?

लेस्टर (ब्रिटन) येथे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अहमद नावाच्या पोलिसाकडून हिंदु पुजार्‍याशी अयोग्य वर्तन !

लेस्टरमध्येच धर्मांध मुसलमानांनी काही मासांपूर्वी हिंदूंवर आक्रमण केले होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते ! या पोलिसांमध्ये सर्वच ‘अहमद’ भरले आहेत, असेच आता या घटनेनंतर वाटू लागले आहे !

इराणमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास

इराणच्या संसदेने सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणार्‍या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणार्‍या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक संमत केले.

कॅनडातील हिंदू खलिस्तानी आतंकवादाच्या सावटाखाली आहेत ! – कॅनडातील हिंदु खासदार चंद्रा आर्या

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जस्टिन ट्रुडो यांनी ‘तेथील हिंदु नागरिकांच्या संरक्षणासाठी ते काय करणार आहेत ?’, हे त्यांना सांगण्यासाठी भाग पाडले पाहिजे !

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !