लेस्टर (ब्रिटन) – येथे एका चौकामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अॅडम अहमद नावाच्या एका पोलिसाने वृद्ध हिंदु पुजार्याची अयोग्य वर्तन केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. ‘इनसाईट यूके’ या गटाने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या गटाने म्हटले की, अॅडम अहमद असे नाव असणार्या पोलिसाने एका हिंदु पुजार्याशी अवमानकारक वर्तन केले. हे स्वीकारता येणार नाही.
सौजन्य इंडिया टूडे
१. या व्हिडिओत अॅडम अहमद याला सहकारी महिला पोलीस पुजार्याशी अयोग्य वर्तणूक न करण्यास सांगत असतांना अहमद तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही यात दिसत आहे. अहमद याने केवळ पुजार्याशीच नाही, तर अन्य एका व्यक्तीशीही अयोग्य वर्तन केले.
२. या पोलिसावर कारवाई झाली कि नाही ? हे समजू शकलेले नाही. याविषयी लेस्टर शहराच्या प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.
संपादकीय भूमिकालेस्टरमध्येच धर्मांध मुसलमानांनी काही मासांपूर्वी हिंदूंवर आक्रमण केले होते आणि पोलीस मूकदर्शक राहिले होते ! या पोलिसांमध्ये सर्वच ‘अहमद’ भरले आहेत, असेच आता या घटनेनंतर वाटू लागले आहे ! |