पीडितांच्या हानीभरपाईचे दावे ६ मासांत निकाली काढण्याचा उच्च न्यायालयाचा लवादाला आदेश

बाणस्तारी येथील अपघातामध्ये मृत झालेले आणि घायाळ झालेले यांच्या कुटुंबियांना हानीभरपाई मिळण्याविषयीचे दावे पुढील ६ मासांत निकाली काढावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मोटर अपघात दाव्यांविषयीच्या लवादाला दिला आहे.

कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

कुरुलकर यांच्‍या अन्‍वेषणात मिळालेली माहिती आणि ए.टी.एस्.ने न्‍यायालयात सादर केलेली कागदपत्रे मिळावीत असा अर्ज बचाव पक्षाचे अधिवक्‍ता ऋषिकेश गानू यांनी न्‍यायालयात दिला, त्‍याला सरकारी अधिवक्‍ता विजय फरगडे यांनी विरोध दर्शवला.

‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल ! एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

२२ ते २७ ऑक्‍टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्‍यात येतील. २७ ऑक्‍टोबरला मुंबईतून विशेष रेल्‍वेने हे कलश देहलीकडे रवाना करण्‍यात येतील. त्‍या वेळीही मोठा सांस्‍कृतिक आणि देशभक्‍तीपर कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल.

उल्‍हासनगर येथील मटका आणि जुगार यांच्‍या अड्ड्यांवर धाडी !

उल्‍हासनगर येथील मध्‍यवर्ती आणि हिललाईन पोलीस ठाण्‍यांच्‍या पोलिसांनी मटका, गुडगुडी, सोराट, कल्‍याण मटका, मांगपत्ता जुगार यांच्‍या अड्ड्यांवर धाडी घालून २२ जणांवर गुन्‍हे नोंद केले आहेत.

मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी सरकारला आम्‍ही रिक्‍शा भरून कागदपत्रे देतो ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते

सरकारने कुठेही न जाता आमच्‍याकडे यावे. आमच्‍याकडे रिक्‍शा भरून कागदपत्रे आहेत. ते पुरावे पाहिल्‍यावर एका दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्‍याविषयीचा अध्‍यादेश काढता येईल, असे प्रतिपादन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

उदयनिधी यांच्‍या विरोधात देशातील सर्व पोलीस ठाण्‍यांत तक्रार करणार ! – मोहन सालेकर, प्रांत मंत्री, विश्‍व हिंदू परिषद, कोकण प्रांत

या वेळी मोहन सालेकर म्‍हणाले, या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍वत:हून कारवाई करावी. हिंदु धर्माला नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू संयमी आहेत; मात्र भित्रे नाहीत.

दाभोलकर हत्‍या प्रकरणी सीबीआय अन्‍वेषणाचा अंतिम अहवाल १३ सप्‍टेंबरला न्‍यायालयात सादर होणार !

अंनिसचे कार्याध्‍यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्‍या प्रकरणात केंद्रीय गुन्‍हे अन्‍वेषण विभागाचे (सीबीआयचे) अन्‍वेषण अधिकारी एस्.आर्. सिंह यांची उलटतपासणी ५ सप्‍टेंबर या दिवशी पूर्ण झाली. अधिवक्‍त्‍या सुवर्णा वस्‍त यांनी सिंह यांची उलटतपासणी घेतली.

शहरात मोकाट गुरे सोडल्‍यास संबंधितांवर दंडात्‍मक कारवाई करणार ! – अभिजित बापट, मुख्‍याधिकारी, सातारा नगरपालिका

पाळीव गुरांच्‍या मालकांनी शहरामध्‍ये मोकाट गुरे सोडल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

लोणीकंद (पुणे) येथे १८ गोवंश वाचवण्‍यात महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या गोरक्षा दलाच्‍या गोरक्षकांना यश !

एकूण १८ गोवंशीय कोणताही चारा पाण्‍याची सोय न करता तारेच्‍या कुंपणामध्‍ये अपुर्‍या जागेत बांधून ठेवलेली होती.

मराठा आरक्षणास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

७ सप्‍टेंबर या दिवशी होणार्‍या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा सांगली – मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी जे आंदोलन चालू आहे, त्‍या आंदोलनास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा आहे. ही समस्‍या न्‍यायालयीन मार्गाने आणि सर्वांच्‍या सहकार्याने सुटून त्‍यातून मार्ग निघावा अन् मराठा समाजास आरक्षण मिळावे. अन्‍य समाजाला ज्‍याप्रकारे आरक्षण आहे, त्‍याप्रकारे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. … Read more