पुणे – शिंदेवाडी ता. हवेली येथील यादव वस्तीतील मोकळ्या जागेत गोवंश कत्तलीसाठी आणले असल्याची माहिती महाराष्ट्र पशू कल्याण अधिकारी राहुल कदम यांनी गोरक्षक अक्षय कांचन यांना दिली. अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक ऋषिकेश कामठे, अजिंक्य कांचन, अनिकेत कुजीर, सौरभ जगताप तेथे गेले असता एकूण १८ गोवंशीय कोणताही चारा पाण्याची सोय न करता तारेच्या कुंपणामध्ये अपुर्या जागेत बांधून ठेवलेली होती. त्यानंतर काही वेळातच तेथे पोलीस आले आणि त्यांनी डांबून ठेवलेल्या गोवंशीयांची सुटका केली. हे गोवंश रामा गायकवाड यांनी कत्तलीसाठी आणल्याचे, तसेच ती दुसर्या कोणत्या तरी व्यक्तीस विक्री करणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या प्रकरणी अक्षय कांचन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.