७ सप्टेंबर या दिवशी होणार्या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पाठिंबा
सांगली – मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पाठिंबा आहे. ही समस्या न्यायालयीन मार्गाने आणि सर्वांच्या सहकार्याने सुटून त्यातून मार्ग निघावा अन् मराठा समाजास आरक्षण मिळावे. अन्य समाजाला ज्याप्रकारे आरक्षण आहे, त्याप्रकारे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. या संदर्भात जिल्ह्याजिल्ह्यांत जे मोर्चे, बंद-आंदोलने चालू आहेत, ती आंदोलने शांततेने पार पाडून शासन आणि समाज यांच्यातील समन्वय बिघडला नाही पाहिजे, असे आपण वागले पाहिजे. या संदर्भात गुरुवार, ७ सप्टेंबर या दिवशी होणार्या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले आहे.
जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत उपोषण करणाऱ्या समाज बांधवांवर पोलिस प्रशासनाच्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवार दि.७ सप्टेंबर२०२३ सांगली जिल्हा बंद च्या आवाहनाला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जाहीर पाठिंबा. #MarathaMorcha #Hindutva4ever pic.twitter.com/LB25Rej9Aq
— Nitin Chougule (@NitinBChougule) September 6, 2023
या प्रसंगी धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, अविनाश सावंत, राजेंद्र राऊत, बाळासाहेब नलवडे, राजू पुजारी, सचिन पवार, अमित करमुसे, संजय बावडेकर, अनिल तानवडे उपस्थित होते.