५० ‘मायक्रॉन’हून अल्‍प जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास मुंबईत ५ सहस्र रुपये दंड !

मुंबई – मुंबई महानगरपालिकेने शहरात २१ ऑगस्‍टपासून प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवर बंदीचा आदेश लागू केला आहे. यामध्‍ये ५० ‘मायक्रॉन’पेक्षा कमी जाडीच्‍या प्‍लास्‍टिक पिशव्‍या वापरल्‍यास ५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्‍यात येणार आहे. ५० ‘मायक्रॉन’हून अल्‍प जाडीच्‍या पिशव्‍या देणारे दुकानदार, विक्रेते, मॉल यांवर कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी भरारी पथकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. याविषयी नागरिकांचे प्रबोधनही करण्‍यात येणार आहे.