पुणे – संशोधन आणि विकासाचा संस्थेचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाने २५ ऑगस्ट या दिवशी उत्तर द्यावे, असा आदेश दिला आहे. कुरुलकर यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही.आर्. कचरे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. सरकारी अधिवक्ता आणि ए.टी.एस्. अधिकारी यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला; मात्र अधिवक्ता ऋषिकेश गानू यांनी या मागणीला विरोध दर्शवला.