हिंदु नावाने बनावट आधारकार्ड बनवणार्‍या २ धर्मांधांना अटक !

बनावट आधारकार्डवर ‘विवेक सोनवणे’ असे बनावट हिंदु नाव टाकून त्यावर स्वतःचे छायाचित्रही लावले होते. हे आधार कार्ड पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांवर अत्याचार होत असलेल्या स्वातंत्र्यावर आम्ही लाथ मारतो !’-मौलाना अब्दुर्रहमान जामई याचे विधान !

‘अशा मौलानांना पाकिस्तानमध्ये हाकून द्यावे. तेथे त्यांनी हवे तेवढे स्वातंत्र्य उपभोगावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !

हिंदु जनजागृती समितीची स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहीम’ !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालय आणि प्रशासन यांनी आवश्यक ती कारवाई करावी, या मागणीसाठी निवेदने देण्यात आली.

सामाजिक माध्यमांवरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे परिणाम भोगावेच लागणार ! – सर्वोच्च न्यायालय

शेखर यांनी नंतर क्षमा मागितली आणि पोस्ट ‘डिलीट’ही केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले होते.

चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातील सैनिकी सरावाची ३०० उपग्रहांद्वारे हेरगिरी !

अमेरिकेत झालेल्या सैनिकी सरावावरही चीनने उपग्रहांच्या माध्यमांतून लक्ष ठेवल्याची माहिती समोर आली होती.

लंडनमध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार्‍यांवर खलिस्तानवाद्यांकडून आक्रमण !

ब्रिटनमध्ये खलिस्तान्यांची वळवळ वाढत चालली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार शेपूट घालून बसले आहे, हे त्यांना लज्जास्पद आहे !

ब्रिटनमध्ये ७ नवजात मुलांच्या हत्येच्या प्रकरणी परिचारिका दोषी

लुसी हिच्या घरातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवर ‘मी दुष्ट आहे, मीच हे केले’ असे लिहिले होते.

मिरज येथे १०० फुटी तिरंगा ध्वजाचे अनावरण !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील पहिला १०० फुटी तिरंगा ध्वज आणि तंतूवाद्य प्रतीकृती (सतार आणि तंबोरा) यांचे लोकार्पण १५ ऑगस्ट या दिवशी पार पडले.

नाशिक येथे ५ लाख रुपयांची लाच घेतांना प्रशासकीय अधिकार्‍याला अटक !

नाशिक येथील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी १५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे. वैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात ते लाच घेत होते.

शारीरिक संबंधांना नकार दिल्याने प्रियकराचे प्रेयसीवर प्राणघातक आक्रमण !

समाजाची नीतीमत्ता आणि स्वार्थी मानसिकता किती खालच्या थराला गेली आहे, हे यावरून लक्षात येते ! साधनाविहीन जीवनाचाच हा परिपाक आहे, हे जाणा !