अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता !
जळगाव – येथील इमरान शब्बीर मन्यार (वय २३ वर्षे) याने स्वतःचे बनावट आधारकार्ड बनवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने बनावट आधारकार्डवर ‘विवेक सोनवणे’ असे बनावट हिंदु नाव टाकून त्यावर स्वतःचे छायाचित्रही लावले होते. हे आधार कार्ड पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्याला साहाय्य करणारा त्याचा मित्र इकबाल खान गौस (वय २४ वर्षे) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका घरातून १ भ्रमणसंगणक, ३ भ्रमणभाष, २ पेनड्राईव्ह आणि आधारकार्ड जप्त केले आहे. या सर्वांतील माहितीचा वापर कशासाठी केला जात होता ?, याचा शोध घेतला जात आहे. दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट आधारकार्ड कसे बनवले, याचे कारण इमरानने पोलिसांना सांगितले नाही. त्याच्या अशा कृत्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता बळावते.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती जाणा ! याविषयी पुरागामी वगैरे कुणीच का बोलत नाही ? |