नाशिक येथे ५ लाख रुपयांची लाच घेतांना प्रशासकीय अधिकार्‍याला अटक !

४३ लाख रुपयांची रक्कमही कह्यात


नाशिक – केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रशासकीय अधिकार्‍याला ५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे. तसेच या वेळी ४३ लाख रुपयांची रक्कमही कह्यात घेतली आहे. हेमंत कुमार असे या अधिकार्‍याचे नाव असून ते सी.जी.एस्.टी.च्या भिवंडी आयुक्तालयात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. २१ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आस्थापनाचे प्रलंबित जी.एस्.टी. प्रकरण निपटवण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच मागितल्यावरून हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट करण्यात आली, तसेच गुन्हाही नोंदवण्यात आला. त्यानंतर आरोपीने लाच म्हणून १५ लाख रुपयांच्या रकमेची बोलणी केली. याच लाचेला पहिला हप्ता घेतांना वरील कारवाई करण्यात आली.

१५ लाख रुपयांची लाच घेणारे नाशिकचे तहसीलदार निलंबित !

नाशिक – येथील तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी १५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी त्यांना निलंबित केले आहे. वैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात ते लाच घेत होते.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेले नाशिक !