लंडन (ब्रिटन) – लंडनच्या साऊथहॉल भागात भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार्या भारतीय वंशांच्या नागरिकांवर चाकूद्वारे आक्रमण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ खलिस्तानवाद्यांना अटक केली. गुरप्रीत सिंह असे एकाचे नाव आहे, तर दुसर्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. गुरप्रीत सिंह हा भारतीय नागरिक आहे. गुरप्रीत सिंह याला पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.
15 अगस्त पर ‘जय श्रीराम’ और ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ के नारे लगाती भीड़ पर खालिस्तानी आतंकी भिंडरावाले की तस्वीर लगी गुरुद्वारे के सामने हमला, 2 घायल#London #Khalistani https://t.co/rUJJUDbD43
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 19, 2023
या आक्रमणाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात दिसत आहे की, काही भारतीय हातात राष्ट्रध्वज घेऊन फेरी काढत आहेत. वाटेत गुरुद्वारा असणार्या ठिकाणी त्यांना खलिस्तानवाद्यांकडून विरोध करण्यात आला. त्या वेळी झालेल्या वादातून स्वातंत्र्यदिन साजरा करणार्यांवर आक्रमण करण्यात आले. या गुरुद्वाराच्या भिंतीवर खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे छायाचित्र लावण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|