चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातील सैनिकी सरावाची ३०० उपग्रहांद्वारे हेरगिरी !

सैनिकी सरावामध्ये भारत, अमेरिका आणि जपान यांचा सहभाग

नवी देहली – चीन ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराजळील समुद्रात चालू असलेल्या सैनिकी सरावाची हेरगिरी करण्यासाठी त्याच्या ३०० हून अधिक उपग्रहांचा वापर करत आहे.

हा सैनिकी सराव १० ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या कालावधीत होत आहे. यात ऑस्ट्रेलियासह भारत, अमेरिका आणि जपान यांच्या नौदलांचा सहभाग आहे. यापूर्वी अमेरिकेत झालेल्या सैनिकी सरावावरही चीनने उपग्रहांच्या माध्यमांतून लक्ष ठेवल्याची माहिती समोर आली होती.