मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था !

१३ वर्षांपासून महामार्गाची स्थिती अशीच असणे हे सर्वपक्षियांना लज्जास्पद नव्हे का ?

पिंपरी (जिल्हा पुणे) येथील कुदळवाडी बनली आहे आतंकवाद्यांचे आगार !

जर्मन बेकरी बाँबस्फोटात चिखलीतील कुदळवाडीतून एका संशयिताला पोलिसांनी कह्यात घेतल्यापासून या परिसरावर पोलिसांचे लक्ष आहे.

३ वर्षांत भारत-चीन सीमेवरील ६० टक्के भागांत रस्त्यांची निर्मिती पूर्ण ! – अजय भट्ट, संरक्षण राज्यमंत्री

सीमेवर चीनच्या वाढत्या आक्रमक कारवाया पहाता भारताने गेल्या ३ वर्षांमध्ये रस्तेबांधणीसाठी गतीशील प्रयत्न केले. सीमेवर मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे.

श्रीलंकेत ‘आधार’ योजनेसाठी भारताने दिले ४५ कोटी रुपये

श्रीलंकेतीही आधारकार्डसारखी योजना राबवण्यात येणार असून या ‘युनिक डिजिटल आयडेंटिटी प्रोजेक्ट’साठी भारताने श्रीलंकेला ४५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे.

यशस्वी जीवनासाठी सात्त्विक जीवनशैली आवश्यक ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘सी-२०’ परिषदेच्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या कार्यकारी गटामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्यावर आनंद झाला; कारण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ‘अध्यात्म संशोधन केंद्र’ हे वरील ३ सूत्रांचे प्रत्यक्ष मूर्तीमंत उदाहरण आहे.

गोवा : पाद्री पेरेरा यांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक टिपण्णी करून हिंदु धर्मीय आणि शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात कलम २९५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली !

चिपळूण पोलिसांनी दिनेश पवार याला केली अटक !

मॉलमध्ये कंत्राट मिळवून देतो, तसेच ४०० बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमीष दाखवत दिनेश पवार तरुणाने नाशिकमधील इगतपुरी भागात अनुमाने २९ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली.

सकारात्मक मनोवृत्तीच्या निर्मितीसाठी ‘संस्कृत स्तोत्र पठण वर्गा’ला होणार प्रारंभ

मंत्रशक्तीने आपल्या शरीर आणि मन यांवर होणार्‍या सकारात्मक पालटांचा लाभ आपणास मिळावा, सकारात्मक मनोवृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील घर बांधकाम आणि दुरुस्ती अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीला मिळावेत !

नागरिकांना घर बांधणी आणि दुरुस्ती करतांना अनेक अडचणी येत आहेत. त्यांना अनुमतीसाठी गावातून तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सतत फेर्‍या माराव्या लागतात.

नीलिमा चव्हाण यांच्या नातेवाइकांचा पोलिसांच्या भूमिकेवर संशय !

‘जे काम पोलिसांनी करायला हवे, ते काम आम्ही करत आहोत’, असा आरोपही नीलिमाचे नातेवाइक करत आहेत. एकूणच नातेवाइकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.