चिपळूण पोलिसांनी दिनेश पवार याला केली अटक !

२९ लाख ५०० सहस्र रुपयांची केली फसवणूक

 

चिपळूण – मॉलमध्ये कंत्राट मिळवून देतो, तसेच ४०० बेरोजगार तरुणांना नोकरी देतो, असे आमीष दाखवत येथील तालुक्यातील ओमळी येथील दिनेश पवार तरुणाने नाशिकमधील इगतपुरी भागात अनुमाने २९ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी दिनेश पवार याला अटक केली आहे. या प्रकरणी शंकर आनंदा उबाळे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद प्रविष्ट केली आहे.

या फिर्यादीनुसार संशयित आरोपी दिनेश पवार याने वर्ष २०१६ पासून इगतपुरी शहरातील रहिवासी शंकर उबाळे आणि संदीप काशिनाथ फोडसे, पोपट बुधा भले यांच्याशी मैत्री केली. तुम्हाला एका ‘मॉल’चे मोठे कंत्राट मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून १५ लाख ५० सहस्र रुपये बँक खात्यातून ग्रीन बीड कार्डद्वारे घेतले, तसेच नोकरी देतो, असे सांगून ४०० बेरोजगार तरुणांकडून प्रत्येकी ३ सहस्र ५०० रुपये याप्रमाणे १४ लाख रुपये जमा करून, एकूण २९ लाख ५०० सहस्र रुपयांची फसवणूक केली, असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये ४०० बेरोजगार तरुण आणि ३ हातमजूर आहेत.