सार्वजनिक बांधकाममंत्र्यांकडून महामार्गाची पहाणी !
मुंबई – मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी ५ ऑगस्ट या दिवशी सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पहाणी केली. त्यांनी दुरुस्ती आणि काँक्रिटीकरण यांचाही आढावा घेतला. गेल्या २ मासांतील हा रस्त्याच्या कामाचा तिसरा आढावा होता. ‘कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल आणि डिसेंबरपर्यंत दोन्ही मार्गिकांचे काम पूर्ण होईल’, असे आश्वासन त्यांनी दिले.
सौजन्य : ABP माझा
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडले आहे. अनेक प्रयत्न करूनही रस्त्याचे काम मार्गी लागत नाही. जुलैमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि कोकणातील प्रवासी यांंचे हाल होत आहेत.
संपादकीय भूमिका
|