पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमधील प्रार्थनेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केल्याचे प्रकरण
वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा नेल्यानंतर पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट
पणजी, ५ ऑगस्ट (वार्ता.) – चिखली येथील ‘एस्.एफ्.एक्स्.’ चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक विधानाचे चलचित्र (व्हिडीओ) सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. वास्को येथील शिवप्रेमींनी ४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ‘पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून त्यांना त्वरित कह्यात घ्यावे’, या मागणीसाठी वास्को पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. त्यानंतर रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक टिपण्णी करून हिंदु धर्मीय आणि शिवप्रेमी यांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात वास्को पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम २९५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी ५ ऑगस्ट या दिवशी मडगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून झाला होता वाद https://t.co/4z7NCeAgpU#goa #goanews #goaupdate #fatherbolmaxpereira #Chicalim #vasco #vascochurch #vascopolicestation
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) August 5, 2023
वास्को येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा नेणार्या शिवप्रेमींनी ‘पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना कह्यात घेऊन समाजापुढे एक चांगले उदाहरण ठेवावे, जेणेकरून भविष्यात असा प्रकार करण्याची कुणाचे धाडस होणार नाही’, अशी मागणी केली. मोर्चामध्ये शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. ‘यापुढे चर्चमधील सार्वजनिक प्रार्थनेमध्ये पाद्री काय सांगतात ? याचे चित्रीकरण करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला पाहिजे’, अशी मागणी काही शिवप्रेमींनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मागणी केली.
बेतुल येथील शिवप्रेमींकडून पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात आणखी १ तक्रार
बेतुल येथील शिवप्रेमींनी ४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. ‘आप’चे वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी शिवजयंतीच्या खर्चाला अनुसरून नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याविषयी बेतुल येथील शिवप्रेमींनी या विधानाविषयी नापसंती व्यक्त करून ‘आमदार क्रूझ सिल्वा यांच्या सर्वांची क्षमा मागावी’, असे आवाहन केले.
पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांना ख्रिस्ती युवकांचे समर्थन
वास्को येथील चर्चच्या बाहेरील गर्दीचे चलचित्र सामाजिक माध्यमात प्रसारित
गुन्हा दाखल; परेरांनी माफीही मागितली https://t.co/SwSGtmyDTa#frbolmax #vasco #protest #policestation #chichalimparishpriest #stationvasco #vasco #goa #goavasco #goanewsalerts #newsalertgoa
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) August 5, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान केल्याच्या प्रकरणी पाद्री पेरेरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कह्यात घेण्याची मागणी करण्यासाठी शिवप्रेमी वास्को पोलीस ठाण्याच्या बाहेर एकत्रित झालेले असतांनाच दुसर्या बाजूला वास्को चर्चच्या बाहेर ख्रिस्ती युवक आणि युवती पाद्री पेरेरा यांच्या समर्थनासाठी एकत्र आले होते.
धार्मिक सलोखा बिघडवणारी विधाने दु:खदायक ! – भाजपचे वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर
सध्या धार्मिक सलोखा बिघडवणारी विधाने केली जात असल्याचे निदर्शनास येत असून हे दु:खदायक आहे. सरकार ही प्रकरणे यशस्वीपणे हाताळणार आहे, यावर मला विश्वास आहे. कुणीही इतर धर्माविषयी अवमानकारक विधाने करू नये आणि धार्मिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन भाजपचे वास्कोचे आमदार संकल्प आमोणकर यांनी वास्को येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना केले.
पाद्री पेरेरा यांचे ‘हिंदु राष्ट्रा’वरील आक्षेपाचे आणखी एक चलचित्र सामाजिक माध्यमांत प्रसारितपाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता निर्माण झालेली असतांना ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेणारे त्यांचे आणखी एक चलचित्र (व्हिडिओ) सध्या सामाजिक माध्यमात प्रसारित झाले आहे. (स्त्रोत : SFX CHICALIM) यामध्ये पाद्री पेरेरा ‘हिंदु राष्ट्रा’विषयी अपसमज पसरवत असल्याचे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करत असल्याचे दिसत आहे. पाद्री पेरेरा या प्रार्थनेत ‘गोदी मिडिया’, ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’, ‘संघ परिवारी’ आदी शब्दांचा वापर केला आहे. |