उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

कठोर शिक्षा असणारा धर्मांतरविरोधी कायदा होत नसल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे लक्षात घ्या !

मानवाने भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा केल्याने पालटत आहे पृथ्वीचा अक्ष (अ‍ॅक्सिस) ! – संशोधन

‘निसर्ग हा मानवासाठी असून तो ओरबाडण्याचा मानवाला अधिकार आहे’, या पाश्‍चिमात्य संकल्पनेमुळेच असे विनाशकारी पालट होत आहेत, यात काय आश्‍चर्य !

महापौरांना ठार मारण्याचा प्रयत्न !  

फ्रान्समध्ये सलग ५ दिवस हिंसाचार चालूच आहे. हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांनी पॅरिसमधील उपनगराच्या महापौरांच्या निवासस्थानाला पेटती चारचाकी धडकवली.

देशविरोधी कारवाया करणार्‍या दोघा जिहादी आतंकवाद्यांना उत्तरप्रदेशमध्ये अटक

उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने देशविरोधी कारवायांच्या प्रकरणी दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक केली. सद्दाम शेख आणि रिझवान खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना चौकशीसाठी पथकाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते.

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांची धर्मस्थळे भ्रष्ट केली जात आहेत आणि त्यांच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहेत. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद !

विशिष्ट भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमतींत घट !

केंद्रशासनाने भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमती अल्प केल्या आहेत. त्यांच्यावर लागणारा वस्तू आणि सेवा कर हा ३१.३ टक्क्यांवरून अनुक्रमे १२ आणि १८ टक्के करण्यात आला आहे.

चिनी आस्थापन ‘अलीबाबा’चे संस्थापक आणि अब्जाधीश जॅक मा यांनी केला पाकिस्तानचा छुपा दौरा !

चीनमधील अब्जाधीश तथा ‘अलीबाबा ग्रुप’चे सहसंस्थापक जॅक मा यांनी नुकताच पाकिस्तानचा छुपा दौरा केला. या दौर्‍याची कल्पना पाकमधील चीनच्या दूतावासालाही नसल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या वेळी मा यांच्यासमवेत १ अमेरिकी आणि ५ चिनी नागरिक उपस्थित होते.

‘कॅरी ऑन जट्टा ३’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंद !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या संदर्भात कठोर कायदा नसल्याने पुनःपुन्हा हिंदूंच्या धार्मिक भावना विविध मार्गांनी दुखावल्या जातात ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

बहुतांश राजकीय पक्ष जनताद्रोही !

‘निवडणुका आणि सरकारविरुद्धच्या काही मोहिमा सोडल्यास राजकीय पक्ष नागरिकांचे आणि देशाचे भले व्हावे म्हणून एकतरी मोहीम राबवतात का ? त्यासंदर्भात ते काही करतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले