विशिष्ट भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमतींत घट !

वस्तू आणि सेवा कर ३१.३ टक्क्यांवरून १२ ते १८ टक्के !

वस्तू आणि सेवा करात घट

नवी देहली – केंद्रशासनाने भ्रमणभाष आणि दूरचित्रवाणी संच यांच्या किमती अल्प केल्या आहेत. त्यांच्यावर लागणारा वस्तू आणि सेवा कर हा ३१.३ टक्क्यांवरून अनुक्रमे १२ आणि १८ टक्के करण्यात आला आहे.

 (सौजन्य : knowledge & Information)

यामुळे जो भ्रमणभाष विकत घेण्यासाठी ३२ सहस्र ८२५ रुपये मोजावे लागत होते, तो आता २८ सहस्र ९९९ रुपयांना मिळणार आहे. यासह ३२ सहस्र ८२५ रुपये मूल्य असलेला २७ इंचचा दूरचित्रवाणी संच आता २९ सहस्र ५०० रुपयांना मिळू शकेल. असे असले, तरी ३२ इंचपेक्षा मोठ्या दूरचित्रवाणी संचावरील कर ३१.३ टक्केच रहाणार आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. ‘व्हॅक्यूम क्लीनर’ आणि ‘यू.पी.एस्.’ यांच्यावरील करही २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.