उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने एका हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ३ मुसलमानांना अटक केली. सहारनपूर येथील  नाजिम हसन, महंमद सादिक आणि अजहर मलिक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी गौरव सिंह या हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केले होते. आतंकवादविरोधी पथकाने सांगितले की, बेंगळुरू येथील अन्य एक आरोपी रेश्मा हिने गौरव सिंह यांना इस्लाम स्वीकारण्यास आमीष दाखवले होते. रेश्मा सध्या पसार आहे.

संपादकीय भूमिका

कठोर शिक्षा असणारा धर्मांतरविरोधी कायदा होत नसल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे लक्षात घ्या !