अतिरेकी सिंचनामुळेच जागतिक स्तरावर समुद्राची पातळी वाढली !

न्यूयॉर्क (अमेरिका) – भूजल नागरिकांना आणि पशूधनाला पिण्याचे पाणी पुरवते अन् पाऊस अल्प पडला असतांना पीक सिंचनासाठी साहाय्य करते; तथापि नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, एक दशकाहून अधिक काळ भूगर्भातील पाण्याचा सतत उपसा केल्याने आपला ग्रह ज्या अक्षावर (‘अॅक्सिस’वर) फिरतो, तो प्रतिवर्षी अनुमाने ४.३ सेंटीमीटरने पूर्वेकडे सरकत आहे. हा पालट पृथ्वीच्या पृष्ठभागावरही दिसून येतो. त्यामुळे जागतिक स्तरावर समुद्राची पातळी वाढली आहे, असे निरीक्षण ‘जिओफिझिकल रिसर्च लेटर्स जर्नल’मध्ये १५ जून या दिवशी प्रकाशित झालेल्या अहवालात संशोधकांनी नोंदवले आहे.

१. वर्ष १९९३ ते २०१० या कालावधीत मानवाने पृथ्वीच्या गर्भातील २ सहस्र १५० अब्ज टन पेक्षा अधिक भूजल काढले. यांपैकी बहुतेक जल पश्चिम उत्तर अमरिका आणि वायव्य भारत येथील आहे, असे या संशोधनात म्हटले आहे.
२. वर्ष २०१६ मध्ये संशोधकांच्या अन्य एका पथकाला असे आढळून आले होते की, वर्ष २००३ ते २०१५ या कालावधीत पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षातील पालट हे हिमनद्या आणि बर्फ यांच्या पालटाशी संबंधित आहे. तसेच पृथ्वीवरील भूजलाच्या साठ्याशी संबंधित आहे.
संपादकीय भूमिका‘निसर्ग हा मानवासाठी असून तो ओरबाडण्याचा मानवाला अधिकार आहे’, या पाश्चिमात्य संकल्पनेमुळेच असे विनाशकारी पालट होत आहेत, यात काय आश्चर्य ! |
मॉरिशस येथे लोकमान्य टिळक यांच्या २ अर्धपुतळ्यांचे अनावरण !
UK Intercepts Russian Tanker : ब्रिटनकडून रशियाची तेलवाहू नौका जप्त : एका भारतीय नागरिकाला अटक
US B-52 Bomber : अमेरिकेत विमान कोसळून ८ जण ठार
Norway Crown Princess’s Son : बलात्काराच्या प्रकरणी नॉर्वेच्या ‘क्राऊन प्रिन्सेस’च्या मुलाला ४ वर्षांचा कारावास !
Japanese Fans Clean Stadium : सामना संपल्यानंतर जपानी प्रेक्षकांनी ‘स्टेडियम’मध्ये पडलेला कचरा स्वतः उचलून परिसर केला स्वच्छ !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !