(म्हणे) ‘चित्रपटामध्ये चीनला खलनायक दाखवले आहे !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

चीन भारतासाठी नायक नसून खलनायकच आहे, असेच भारतियांना वाटत असल्याने तेच चित्रपटात दाखवले जाणार ! चीनला जर हे चुकीचे वाटते, तर त्याने भारताचा मित्र असणारी कृती करून दाखवावी !

(म्हणे) ‘पाकमध्ये कारवाया करणार्‍या तालिबानी आतंकवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये मिळत असलेला आश्रय सहन करणार नाही !’ – पाकचे संरक्षणमंत्री

आमच्याकडे टीटीपीचे आतंकवादी असल्याचा पाकने पुरावा द्यावा ! – तालिबानने पाकला सुनावले !

सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रकियेला प्रारंभ !

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३२ गावांतील १ सहस्र ३.७५ एकर भूमीचे भूसंपादन केले जाणार आहे. ८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर ३ मोठे उड्डाणपूल, तर ११० विविध पुलांचा समावेश असणार आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे विजेचा धक्का लागल्याने ५ कावड यात्रेकरूंचा मृत्यू, तर १६ जण घायाळ

विद्युत् विभागाच्या अधिकार्‍यांच्या निष्काळीपणामुळे घटना घडल्याचा आरोप

सातारा येथील स्नेहल मांढरे हिला ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कार घोषित !  

धनुर्विद्या खेळात उत्तुंग कामगिरी केल्याविषयी सातारा येथील स्नेहल विष्णु मांढरे हिला राज्यशासनाच्या वतीने वर्ष २०१९-२० या कालावधीतील ‘शिवछत्रपती’ हा राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी भारताच्या समर्थनार्थ काढली शांतता फेरी !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासांवरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणांचे प्रकरण

‘द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या युद्धाचे चित्रण

कुंकळ्ळी (गोवा) येथे पोर्तुगिजांविरुद्ध लढा दिलेल्या १६ महानायकांना मानवंदना !

श्री शांतादुर्गा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्मारकावर जलाभिषेक करून महानायकांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘हिंदु अस्मितेचा आविष्कार’ या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग : मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.

गोव्यात पुन्हा वीज दरवाढ होणार !

सरासरी दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. आता ही दुसरी वीज दरवाढ होणार आहे. वीजदेयके २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही योजना तात्काळ लागू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.