सोलापूर – सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ३२ गावांतील १ सहस्र ३.७५ एकर भूमीचे भूसंपादन केले जाणार आहे. ८४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर ३ मोठे उड्डाणपूल, तर ११० विविध पुलांचा समावेश असणार आहे. राज्य सरकारने या मार्गासाठी ४५२ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीला नुकतीच संमती दिली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कालावधी ४ वर्षांहून २ वर्षांवर आणण्यासाठी सुधारित आराखडा सिद्ध करण्यात आला आहे.