भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी भारताच्या समर्थनार्थ काढली शांतता फेरी !

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासांवरील खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणांचे प्रकरण

सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) – येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान्यांनी दोन वेळा आक्रमण केल्यानंतर आता तेथील भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी संघटित होऊन दूतावासाजवळ शांतता फेरी काढत भारताला पाठिंबा दर्शवला. या वेळी या नागरिकांनी खलिस्तानच्या आक्रमणाला ‘आतंकवादी कृत्य’ ठरवत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? अमेरिकेच्या सरकारला ते कळत नाही का ? – संपादक)

१९ मार्च आणि २ जुलै या दिवशी खलिस्तान्यांनी दूतावासावर आक्रमणे केली होती.