गोव्यात पुन्हा वीज दरवाढ होणार !

पणजी, १५ जुलै (वार्ता.) – महसुलातील तूट भरून काढण्यासाठी सरकार वीजदेयकांवर २० ते ७० पैशांपर्यंत अतिरिक्त सेवाकर लागू करणार आहे. यामुळे ग्राहकांना वाढीव दराने वीजदेयके भरावी लागणार आहेत. घरगुती आणि व्यावसायिक ग्राहक दोघांनाही हा नवीन दर लागू होणार आहे.

राज्यातील वीज खात्याने वीज दरात अधिसूचित केलेल्या ५.२ टक्के दरवाढीला संयुक्त विद्युत् नियामक आयोगाने संमती दिली आहे. सरासरी दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. आता ही दुसरी वीज दरवाढ होणार आहे. वीजदेयके २० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही योजना तात्काळ लागू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.