सप्‍तशृंगी गडावरून एस्.टी. बस ४०० फूट दरीत कोसळून एका महिलेचा मृत्‍यू !

सप्‍तशृंगी गडावरून खाली येतांना एस्.टी. बस दरीत कोसळली. या अपघातात अमळनेर मुडी येथील आशाबाई राजेंद्र पाटील या महिलेचा मृत्‍यू झाला आहे. याच गावातील १३ प्रवासी असे एकूण १८ प्रवासी घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०० कोटींचा घोटाळा उघडकीस !

सहकारी संस्‍थेच्‍या जिल्‍हा उपनिबंधकांच्‍या आदेशावरून विशेष लेखापरीक्षक धनंजय चव्‍हाण यांनी वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखापरीक्षण केले, तसेच जून २०२३ मध्‍ये त्‍यांनी याचा अहवाल वरिष्‍ठांकडे सादर केला.

इंडियन मुजाहिदीनच्या ४ जिहाद्यांना १० वर्षांची शिक्षा !

भारतविरोधी षड्यंत्र रचणार्‍या जिहाद्यांना शिक्षा देण्यासाठी एका न्यायालयाला ११ वर्षे लागतात ? सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घालून न्यायप्रणाली गतीमान करण्यासाठी दिशानिर्देश द्यावेत, असे राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते !

रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून ‘इस्कॉन’चे धार्मिक नेते अमोघ लीला दास यांच्यावर बंदी

अमोघ लीला दास यांनी त्यांच्या विधानाविषयी क्षमा मागितली आहे.

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे थरमन षणमुगरत्नम् राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार !

थरमन यांचा जन्म सिंगापूरमध्येच झाला आहे. सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एका अँग्लो-चिनी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

कर्नाटकमध्ये यावर्षी ‘महिष दसरा’ (महिषासुराची जयंती) साजरा करणार !

हिंदु धर्माच्या विरोधात कृती करून असुरांना आदर्श ठरवणारे स्वतःही त्याच मानसिकतेचे आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

केरळमधील ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात तोडल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे ६ जण दोषी !

विशेष ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के. भास्कर यांनी खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात आरोपींना भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर गुन्हे, यांसाठी दोषी ठरवले.

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांत ६१ टक्के पदे रिक्त !

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांतील १३६ शिक्षकांची पदे भरण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

हिमाचल प्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रयत्नात असणार्‍या ११ ख्रिस्ती मिशनर्‍यांना अटक

कठोर धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा लोकांचे फावते आहे !

जगात मानवता, स्थिरता आणि शांती यांचे संवर्धन करण्यासाठी भारताचे योगदान मोठे ! – अल-ईसा, प्रमुख, वर्ल्ड मुस्लिम लीग

भारत हे हिंदुबहुल राष्ट्र आहे. तरीही त्याची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. समान अधिकार देणारी आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारी भारतीय राज्यघटना पवित्र आहे.