मैसुरू (कर्नाटक) – ‘महिष दसरा समिती’च्या वतीने यावर्षी महिष दसरा साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे, असे माजी महापौर पुरुषोत्तम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुरुषोत्तम म्हणाले की, वर्ष २०१५ पासूनच महिष दसरा साजरा करण्यात येतो. गेल्या ५ वर्षांत भाजप सरकार विरोध केल्याने तो साजरा करण्यात आला नाही. यंदाच्या वर्षापासून महिष दसरा साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. (काँग्रेस सरकार आल्यावर हिंदु धर्माचा द्वेष करणार्यांचे फावते, हे काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक) महिष दसरा साजरा करण्याविषयी समितीच्या वतीने अजून अर्ज दिलेला नाही. जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी महिष दसरा साजरा करण्यासाठी अनुमती देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
(म्हणे) ‘महिष सत्य, तर चामुंडा मिथ्या ! – निवृत्त प्रा. महेश चंद्रगुरु
महिष दसरा साजरा करायचा तो ‘दसरा’ सणाला विरोध करण्यासाठी नाही. असुर हे राक्षस नव्हेत, तर रक्षक आहेत. (या ‘शोधा’साठी अशांना पुरस्कारच द्यायला हवा ! – संपादक) महिष सत्य. चामुंडा मिथ्या. तुम्ही चामुंडाचे पूजन करता, तर करा. आम्ही महिष दसरा साजरा करतो, त्याला विरोध का करता ?, असे विधान निवृत्त प्राध्यापक महेश चंद्रगुरू यांनी या वेळी केले.
ते पुढे म्हणाले की,
१. महिष आमचा चारित्र्य पुरुष आहे. (असुरांना चारित्र्यपुरुष मानणार्यांचा चारित्र्यावर कुणी शंका उपस्थित केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
२. या भूमीवरील महापुरुषांचा गौरव करणे आणि त्यांचे स्मरण करणे, हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. राज्यघटनेने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. (राज्यघटनेच्या अधिकाराच्या नावाखाली काहीही सांगणार्यांना विरोध करण्याचा अधिकारही राज्यघटनेनेच जनतेला दिला आहे ! – संपादक)
३. गेली ५ वर्षे आपल्याला महिष दसरा साजरा करण्याची संधी दिली नाही. इतिहास आणि आपल्या परंपरा विसरू नयेत. चामुंडामाता पुराण प्रसिद्ध आहे; परंतु महिष इतिहासपुरुष आहे. पुराण या रचलेल्या कथा आहेत, तर इतिहास म्हणजे सत्यकथा आहेत. (या देशात अशा प्रकारचे थोतांड सांगणार्यांची संख्या कमी नाही. अशांना किती महत्त्व द्यायचे, हे हिंदूंना ठाऊक आहे ! – संपादक)
४. सत्य आणि असत्य यांच्यातील हा संघर्ष आहे. पुढच्या पिढीला आम्ही इतिहास सांगितला नाही, तर कोण सांगेल ? तुम्ही कोणताही दसरा साजरा करा. आम्ही विरोध करणार नाही. (हिंदूंच्या दसरा सणाला कुणी विरोध केला, तरी त्याला हिंदू कधी भीक घालणार नाहीत, हे अशा लोकांनी नेहमीच लक्षात ठेवावे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माच्या विरोधात कृती करून असुरांना आदर्श ठरवणारे स्वतःही त्याच मानसिकतेचे आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! |