रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून ‘इस्कॉन’चे धार्मिक नेते अमोघ लीला दास यांच्यावर बंदी

(इस्कॉन म्हणजे ‘इंटरनेशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’)

‘इस्कॉन’चे पुजारी अमोघ लीला दास

कोलकत्ता (बंगाल) – ‘इस्कॉन’ या संस्थेने त्यांचे एक धार्मिक नेते अमोघ लीला दास यांच्यावर एका मासासाठी बंदी घातली आहे. इस्कॉनने म्हटले आहे, ‘अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने झालेल्या वादानंतर दास यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ अमोघ लीला दास यांनी त्यांच्या विधानाविषयी क्षमा मागितली आहे. तसेच त्यांनी ते एक मास गोवर्धन पर्वताजवळ जाऊन प्रायश्‍चित्त घेणार असल्याचे म्हटले आहे.

अमोघ लीला दास यांनी स्वामी विवेकानंद यांच्या मासे खाण्यावरून म्हटले होते, ‘एक सदाचारी व्यक्ती कधीही कोणत्याही प्राण्याला हानी पोचवणार नाही.’ तसेच  रामकृष्ण परमहंस यांच्या ‘जितके मत तितके मार्ग’ या विचारांवर उपहासात्मक टीका करतांना म्हटले होते, ‘प्रत्येक मार्ग एकाच लक्ष्यापर्यंत जात नाही.’ तृणमूल काँग्रेसचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष यांनी यावर आक्षेप घेत अमोघ लीला दास यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.