जगात मानवता, स्थिरता आणि शांती यांचे संवर्धन करण्यासाठी भारताचे योगदान मोठे ! – अल-ईसा, प्रमुख, वर्ल्ड मुस्लिम लीग

महंमद बिन अब्दुल करीम अल-ईसा

नवी देहली – वर्ल्ड मुस्लिम लीगचे प्रमुख महंमद बिन अब्दुल करीम अल-ईसा हे ५ दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी खुसरो फाऊंडेशनने ‘इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर’मध्ये आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. त्या वेळी ते म्हणाले की, जगात मानवता, स्थिरता आणि शांती यांचे संवर्धन करण्यासाठी भारताने मोठे योगदान दिले आहे. त्यांनी या वेळी भारताच्या राज्यघटनेची प्रशंसा केली.

भारतीय मुसलमानांना हिंदुस्थानी असल्याचा अभिमान – अल्-ईसा

अल-ईसा म्हणाले की, भारत हे हिंदुबहुल राष्ट्र आहे. तरीही त्याची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. जगात नकारात्मक विचार पसरवले जात आहेत. समान अधिकार देणारी आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारी भारतीय राज्यघटना पवित्र आहे. भारतीय मुसलमानांना हिंदुस्थानी असल्याचा अभिमान आहे.

संपादकीय भूमिका

‘भारतातील मुसलमान असुरक्षित आहे’, असे म्हणणार्‍या भारतातील निधर्मीवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?