नाशिक – सप्तशृंगी गडावरून खाली येतांना एस्.टी. बस दरीत कोसळली. या अपघातात अमळनेर मुडी येथील आशाबाई राजेंद्र पाटील या महिलेचा मृत्यू झाला आहे. याच गावातील १३ प्रवासी असे एकूण १८ प्रवासी घायाळ झाले आहेत. घायाळांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृत महिलेच्या नातेवाईकास एस्.टी. महामंडळाने १० लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. सप्तशृंगी घाटातील ‘गणपति पॉईंट’जवळ बस थेट ४०० फूट दरीत कोसळली.