केरळमधील ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात तोडल्याच्या १३ वर्षे जुन्या प्रकरणात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे ६ जण दोषी !

थिरुवनंतपूरम् (केरळ) – वर्ष २०१० मध्ये कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी न्यूमन महाविद्यालयाचे प्राध्यापक टी.जे. जोसेफ यांचा हात तोडल्याच्या घटनेच्या प्रकरणात केरळमधील विशेष ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाने ६ जणांना दोषी ठरवले. हे सर्व जण बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचे सदस्य आहेत. विशेष ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाचे न्यायाधीश अनिल के. भास्कर यांनी खटल्याच्या दुसर्‍या टप्प्यात आरोपींना भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्येचा प्रयत्न, कट रचणे आणि इतर गुन्हे, यांसाठी दोषी ठरवले.

या प्रकरणातील अन्य ५ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पहिल्या टप्प्यात ३१ आरोपींविरुद्ध खटला चालवला गेला आणि वर्ष २०१५ मध्ये त्यांपैकी १३ जणांना दोषी ठरवण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नव्हे, तर अन्याय !