सिंगापूर – येथील भारतीय वंशाचे ज्येष्ठ मंत्री थरमन षणमुगरत्नम् राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी सर्व अधिकृत आणि राजकीय पदांचे त्यागपत्र दिले आहे. ६६ वर्षांचे थरमन षणमुगरत्नम् हे सिंगापूर सरकारमध्ये सामाजिक धोरणांचे समन्वयक मंत्री होते. थरमन यांनी वर्ष २००१ मध्ये संसद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी आतापर्यंत उपपंतप्रधान, तसेच शिक्षण आणि अर्थ मंत्री यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्रीपदे भूषवली आहेत.
अब सिंगापुर पर भी होगा भारतीय का राज! भारतीय मूल के थरमन शनमुगरत्नम कर रहे हैं राष्ट्रपति चुनाव लड़ने की तैयारी
.
.#Singapore #singaporepresidentelection #tharmanshanmugaratnam @DBhaskarHindi #Adipurush #JawanTrailer #BabyTrailer #SalaarCeaseFire https://t.co/UXGsfVTH9x— Dainik Bhaskar Hindi (@DBhaskarHindi) July 8, 2023
सिंगापूरच्या चलन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. थरमन यांचा जन्म सिंगापूरमध्येच झाला आहे. एका अँग्लो-चिनी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ यांसारख्या जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले आहे.