बद्रीनाथ आणि केदारनाथ यांना इस्लामी स्थान म्हणणार्‍या तथाकथित साधूच्या विरोधात गुन्हा नोंद !

तथाकथित साधू स्वामी अदृश्यानंद

चमोली (उत्तराखंड) – येथे बद्रीनाथ आणि केदारनाथ या तीर्थक्षेत्रांविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका तथाकथित साधूच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या तथाकथित साधूचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर स्वामी अदृश्यानंद यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या साधूचे नाव शांतनू विश्‍वास असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये तथाकथित साधूने बद्रीनाथला ‘बदरूद्दीन’ आणि केदारनाथला ‘केदारूद्दीन’ म्हणत तेथे नमाजपठण केल्याचे सांगितले होते.

संपादकीय भूमिका

  • अशांना आजन्म कारागृहात टाका !