२६/११ आक्रमणातील आरोपी तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणास अमेरिकेची स्वीकृती !

तहव्वूर राणा (डावीकडे )

वॉशिंग्टन (अमेरिका) – मुबंईत २६ नोव्हेंबर २००८ (२६/११) मध्ये झालेल्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणात सहभागी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक तहव्वूर राणा याला भारतात प्रत्यार्पित करण्यास अमेरिकेतील न्यायालयाने होकार दिला आहे.

१. लॉस एंजिल्स जिल्हा न्यायालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, राणावर असलेल्या आरोपांकडे पहाता, तो प्रत्यार्पित करण्यास पात्र आहे. २६/११ च्या आक्रमणात राणाचा हात होता.

२. त्याला प्रत्यार्पित करण्याच्या भारताच्या मागणीनंतर अमेरिकेत राणाला अटक झाली होती.

३. न्यायालयातील सुनावणीच्या वेळी अमेरिकेच्या सरकारी अधिवक्त्यांनी म्हटले होते की, राणाचा बालपणीचा मित्र आणि पाकिस्तानी-अमेरिकी नागरिक डेव्हिड कोलमन हेडली याचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध होते. राणाने हेडलीला साहाय्य केले होते. हेडलीच्या नियोजनाविषयी राणाला ठाऊक होते.