नागरी क्षेत्र विकासाच्या नावाखाली सरकारी निधीतून अल्पसंख्यांकांच्या धार्मिकस्थळांचा विकास !

अल्पसंख्यांकबहुल क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेच्या अंतर्गत राज्यशासनाने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्यांकबहुल भागात नागरी सुविधा देण्यासाठी या निधीचा उपयोग करावा, असे या योजनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानात सैन्याचे ‘मिग २१’ विमान कोसळले : २ महिलांचा मृत्यू

विक्रम होईल इतके ‘मिग २१’विमानांचे अपघात झाले असतांना ही विमाने बाद का करण्यात येत नाहीत ? अशी सदोष विमाने असणे, हे सक्षम युद्धसज्जेतेचे लक्षण कसे असू शकते ?

(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

अतिक अहमद याची फरार पत्नी शाईस्ता परवीन ‘माफिया’ घोषित !

इतके दिवस एका महिला माफियाला पकडू न शकणे पोलिसांना लज्जास्पद !

महाराष्ट्रातील २८ दूध योजना आणि ६५ शीतकरण केंद्रे यांतील यंत्रसामग्री भंगारात !

पूर्वी शीतकरण केंद्रांमध्ये दिवसाला २ लाख लिटर दूध संकलन होत होते; मात्र सहकारी संस्था आणि खासगी दूध डेअरी यांची संख्या वाढल्याने दूध संकलन अल्प होत गेले.

खडकवासला धरणातील प्रदूषण रोखणे आणि चौपाटी परिसरातील गर्दीचे नियोजन करणे यांसाठी संयुक्त पहाणी !

लाखो पुणेकरांची तहान भागवणार्‍या खडकवासला धरणाच्या पाण्यात सहस्रो पर्यटक उतरून पाण्याचे प्रदूषण करत असतात, तसेच येथील चौपाटी परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीही होत असते.

पटसंख्येच्या नावे शासनाने ५ सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये ! – श्रीपाद जोशी, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे संयोजक

२० पटसंख्येपेक्षा अल्प विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन (अन्य व्यवस्था करून) करून अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे; पण ‘ही गंभीर गोष्ट असून पटसंख्येच्या नावावर शासनाने ५ सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये’, अशी मागणी..

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात २ सहस्र ८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात ८८ लाख रुपयांची रोख रक्कम, मद्य, रसायन, गांजा असा ४ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘अकौन्टन्सी’ संग्रहालय होणार

नव्या पिढीला अकौन्टन्सीविषयी माहिती व्हावी, गोडी लागावी आणि अकाउंटचा इतिहास, व्यवहाराच्या पद्धती समजून घेता याव्यात, यासाठी हे संग्रहालय उपयुक्त ठरणार आहे.

नदी स्वच्छ, प्रदूषणमुक्त करण्यासाठी दूषित पाणी नदीमध्ये जाऊ न देणे आवश्यक ! – डॉ. सुरेश खाडे, पालकमंत्री, सांगली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत कृष्णा नदीच्या तीरावर झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.