गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज आणि इतर संतांचे आशीर्वाद !

सर्व संतांनी हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठीच्‍या कार्यास आशीर्वाद देऊन पाठिंबा दिला. या वेळी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी ‘या महोत्‍सवाला मी येण्‍याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले.

पुणे नदी सुधार योजनेमध्‍ये केवळ झुडूप प्रकारातील झाडे तोडण्‍यात येणार ! – महापालिका प्रशासनाचे स्‍पष्‍टीकरण

नदी सुधार प्रकल्‍पामध्‍ये ६ ते ७ सहस्र झाडे तोडण्‍यात येणार असल्‍याची चर्चा पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पुणेकर यांच्‍यात असल्‍याने २९ एप्रिल या दिवशी ‘चिपको’ आंदोलन करण्‍यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने वरील सूत्र स्‍पष्‍ट केले आहे.

रस्‍त्‍यांची गुणवत्ता पडताळण्‍यासाठी महामंडळाची स्‍थापना !

३ मे या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या  मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला.

आतंकवादी आक्रमणात अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित ठेवण्‍याविषयीचा तज्ञांचा अहवाल राज्‍यशासनाला सादर !

आतंकवादी आक्रमण, तसेच अन्‍य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्‍णालये, पंचतारांकित हॉटेल्‍स, शाळा, देवस्‍थाने आदी अतीमहत्त्वाच्‍या वास्‍तू सुरक्षित कशा ठेवव्‍यात ? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने  राज्‍यशासनाकडे सादर केला आहे.

‘राष्‍ट्रासाठी मरणे म्‍हणजे जगणे’, असा स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार ! – योगेश सोमण, अभिनेते, लेखक

त्‍यांची राष्‍ट्रभक्‍ती, शैक्षणिक धोरण, संरक्षण धोरण अशा विविध वैचारिक सूत्रांवर बोलले पाहिजे. ‘राष्‍ट्रासाठी मरणे म्‍हणजे जगणे’, असा सावरकर यांचा विचार होता. छत्रपती शिवाजी महाराज व्‍याख्‍यानमालेचे दुसरे पुष्‍प या विषयावर ते बोलत होते

आज शेवगाव (नगर) येथे ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ पुरस्‍कार वितरण सोहळा !

‘गुरुदत्त सामाजिक संस्‍थे’च्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन पुरस्‍कार वितरण सोहळा त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त ५ मे म्‍हणजेच बुद्ध पौर्णिमेला  दुपारी ४ वाजता येथील वैशंपायननगरमधील श्रीदत्त देवस्‍थानच्‍या दादाजी प्रसादालयात होणार आहे.

जळगाव येथे बसस्‍थानक आणि विभागीय कार्यालय यांची पुनर्बांधणी होणार !

विभागीय कार्यालय पुनर्बांधणीसाठी १८ कोटी रुपये, जळगाव आगार नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण यांसाठी ६ कोटी, तर विभागीय कार्यशाळा नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण यांसाठी ८ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्‍ताव प्रशासकीय संमतीसाठी पाठवला आहे.

भारत सर्वमान्‍य नेतृत्‍वाच्‍या दिशेने !

जी-२० नंतर ‘एस्.ओ.सी.’चे यशस्‍वी आयोजन करून भारताने जागतिक स्‍तरावर दबदबा वाढवणे हे कौतुकास्‍पद ! विशेष म्‍हणजे रशिया, चीन, उझबेकिस्‍तान, कझाकिस्‍तान, तुर्कीये यांच्‍या समवेत यंदा १२ वर्षांनंतर पाकिस्‍तानचे परराष्‍ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी या बैठकीसाठी येणार आहेत.

सेलिब्रेटींचा पोरखेळ !

भरकटलेल्‍या तरुणाईला योग्‍य वाट दाखवण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे यांचा पाया निर्माण करायला हवा, तसेच सेलिब्रेटींच्‍या कृतींचा आदर्श ठेवायचा का ? हेही तरुणाईने ठरवायला हवे !

बजरंग दल पर प्रतिबंध लगाने का कांग्रेस का उद्देश्‍य नहीं ! – कांग्रेस

बजरंग दल पर प्रतिबंध लगाने का कांग्रेस का उद्देश्‍य नहीं ! – कांग्रेस