पुणे नदी सुधार योजनेमध्‍ये केवळ झुडूप प्रकारातील झाडे तोडण्‍यात येणार ! – महापालिका प्रशासनाचे स्‍पष्‍टीकरण

२९ एप्रिल या दिवशी करण्‍यात आलेले ‘चिपको’ आंदोलन

पुणे – मुळा-मुठा नदी काठ पुनरुज्‍जीवन प्रकल्‍पाच्‍या अंतर्गत येणार्‍या नदी सुधार योजनेमध्‍ये संबंधित ठिकाणी सुबाभूळ, कुबाभूळ ही सर्व झुडूप प्रकारातील झाडे आहेत. त्‍याची अनियंत्रित वाढ होते. आवश्‍यक असतील तेथीलच ही झुडपे काढण्‍यात येणार आहेत, असे महापालिका प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

त्‍या संदर्भातील एक चलचित्र (व्‍हिडिओ) प्रसारित करण्‍यात आले आहे.

नदी सुधार प्रकल्‍पामध्‍ये ६ ते ७ सहस्र झाडे तोडण्‍यात येणार असल्‍याची चर्चा पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पुणेकर यांच्‍यात असल्‍याने २९ एप्रिल या दिवशी ‘चिपको’ आंदोलन करण्‍यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने वरील सूत्र स्‍पष्‍ट केले आहे.


महापालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख म्‍हणाले, ‘‘या प्रकल्‍पामधील ६ ते ७ सहस्र झाडे तोडण्‍यात येणार यामध्‍ये काहीही तथ्‍य नाही. केवळ १० किलोमीटर नदीकाठ विकसित केला जाणार आहे. त्‍याकरिता सर्वेक्षण केलेली ३ सहस्र झाडे त्‍यातील बहुतांश झुडूप प्रकारातील वृक्षांची तोड केली जाणार आहे. स्‍थानिक प्रजातीची कोणतीही झाडे काढली जाणार नाहीत.’’