आध्यात्मिक बळ आणि हिंदु राष्ट्र !

‘एका ॲटम्बॉम्बमध्ये लाखो बंदुकांचे सामर्थ्य असते, तसे आध्यात्मिक बळामध्ये भौतिक, शारीरिक आणि मानसिक बळांच्या अनंत पटींनी सामर्थ्य असते. असे असल्यामुळे धर्मप्रेमींनी ‘संख्याबळ अल्प असतांना हिंदु राष्ट्र कसे होईल ?’, याची काळजी करू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात. श्री. राज कर्वे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. ह.भ.प. संदीप मांडके आणि सौ. मांडके यांनी जिज्ञासेने कार्य जाणून घेतले.

पश्चिम महाराष्ट्रात गदापूजन करून हनुमंताला हिंदु राष्ट्रासाठी साकडे !

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे २७० हून अधिक ठिकाणी गदापूजन, सोलापूर, लातूर, बीड येथे ९० हून अधिक ठिकाणी गदापूजन.

मुंबई, ठाणे, रायगड येथे हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन !

हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत घाटकोपर, चेंबूर, गोरेगाव आणि नवी मुंबईत सानपाडा आणि आंग्रोळी गाव येथे गदा पूजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात वावे येथे, तर ठाण्यामध्ये पिंपळपाडा आणि नालासोपारा येथे गदापूजन करण्यात आले.

भाईंदर येथे क्षुल्लक कारणावरून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या !

१३ वर्षीय मुलाने केस पुष्कळ छोटे कापले गेल्याच्या कारणासाठी इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सर्व जण झोपलेले असतांना त्याने स्नानगृहाच्या खिडकीतून उडी मारली.

सरपंच गोपाळे हत्या प्रकरणी ७ जण कह्यात !

स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांची हत्या केल्याचा संशय त्यांचे भाऊ रवींद्र यांनी व्यक्त केला होता; मात्र पोलीस अन्वेषणात नेमके कारण समोर आले नाही.

कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे ! – सौ. राजश्री देशमुख, हिंदु जनजागृती समिती

जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. सध्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे.

चोर सोडून संन्याशाला अटक करणारे तेलंगाणा पोलीस !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करून सायंकाळी सुटका केली.

गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा मिळण्यासाठी विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे प्रयत्न !

काँग्रेसने इंग्रजांच्या प्रथा पाळण्यात धन्यता मानली. तिने हिंदूंच्या रामसेतू, गोमाता, गंगा, तसेच १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम अशा वैभवांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यांचा विकास करण्याऐवजी त्यांनी मोठमोठी मंदिरे अधिग्रहित करून त्यांचे धन लुबाडले.