दारुचे व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीच्या मेंदूत बसवली ‘चीप’ !

  • मद्यपान करण्याची इच्छा नष्ट करणारे ‘नेल्ट्रॅक्सोन’ रसायन चिपद्वारे सोडले मेंदूत !

  • अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया !

(‘चीप’ म्हणजे विशिष्ट कार्य करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र)

प्रतिकात्मक छायाचित्र

बीजिंग (चीन) – चीनमध्ये दारूच्या व्यसनाने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीच्या शरिरात एक ‘अल्कोहोल क्रेव्हिंग चीप’ (दारूचे व्यसन सुटण्यासाठी बनवण्यात आलेली ‘चीप’) बसवण्यात आली आहे. लियू असे या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव असून अशा प्रकारे शस्त्रक्रिया झालेली ती चीनमधील पहिलीच व्यक्ती आहे. ‘या शस्त्रक्रियेमुळे लीयूचे दारूचे व्यसन सुटेल’, असा दावा केला जात आहे.

१. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या चिपद्वारे ‘नेल्ट्रॅक्सोन’ नावाचे रसायन मेंदूत सोडले जाते. हे रसायन शरीर शोषून घेते. व्यसनाधीन लोकांवर उपचारांसाठी ‘नेल्ट्रॅक्सोन’चा वापर केला जातो.

२. लीयू हा गेल्या १५ वर्षांपासून दारू पीत होता. तो एका वेळी एका लिटरहून अधिक दारू प्यायचा. दारू प्यायल्यानंतर तो हिंसक व्हायचा. यामुळे त्याला नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले होते. ‘जर मला दारू मिळाली नाही, तर मी इतरांना पुष्कळ त्रस्त होतो’, असे लीयूने सांगितले. ‘शस्त्रक्रियेनंतर आता सर्वसाधारण जीवन जगीन’, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

  • मुळात मनुष्य व्यसनाच्या आहारीच जाऊ नये, यासाठी विज्ञानाकडे उपाय नाही ! ती क्षमता अध्यात्मात आहे. त्यासाठीे मनुष्याला साधना करणे क्रमप्राप्त आहे !