मुंबई – शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि पक्षनिधी हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतर अधिवक्ता आशिष गिरी यांनी ‘शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि शिवसेनेचा पक्षनिधी एकनाथ शिंदे यांच्या गटाला द्यावा’, अशी मागणी याचिकेत केली होती. ‘याचिका प्रविष्ट करणारे तुम्ही कोण?’, असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने गिरी यांची याचिका फेटाळली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपिठासमोर २८ एप्रिल या दिवशी ही सुनावणी पार पडली.
शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे#ShivSenaCrisis #shivsenabhavan #shivsenaeknathshinde https://t.co/EigOir8GhA
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 28, 2023