तुर्की नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी आलेल्या विमानावर आक्रमण !

सुदान येथील संघर्ष !

तुर्की लोकांना खार्टूम शहरातून बाहेर काढण्यासाठी आलेल्या विमानावर आक्रमण

खार्टूम (सुदान) – तुर्की लोकांना हिंसाचारग्रस्त खार्टूम शहरातून बाहेर काढण्यासाठी दाखल झालेल्या विमानावर आक्रमण झाल्याची घटना समोर आली आहे. या आक्रमणात कुणी घायाळ झालेे नसले, तरी विमानातील इंधन व्यवस्था नष्ट झाली आहे. सुदानच्या सैन्याने ‘हे आक्रमण निमलष्करी दलाने केले आहे’, असा आरोप केला आहे, तर दलाने मात्र आरोप फेटाळले असून अन्य देशांतील नागरिकांच्या हिताचा ते विचार करत असल्याचे स्पष्ट केले.

गेल्या २ आठवड्यांपासून सुदानी सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष होत असून राजधानी खार्टूम शहराला हिंसाचाराने ग्रासले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा या संघर्षात जीव गेला असून लक्षावधी लोकांना त्यांचे घर सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे.