सोलापूर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता; मात्र मी ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक वाचले आणि माझे मत पालटले. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला यांचा अवमान करण्यात आला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. (काय अवमान वाटतो ? ते प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले नाही. ‘सहा सोनेरी पाने’ पुस्तक आतापर्यंत लाखो लोकांनी वाचले आहे. या लोकांना पुस्तकात कोणत्याही महापुरुषांचा अवमान झाल्याचे वाटले नाही. काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना ते वाटते, म्हणजे काँग्रेसींच्या मनात, नव्हे तर त्यांच्या रक्तातच सावरकरद्वेष असल्याने ते कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणतात, तर कधी त्यांच्यावर खोटे आरोप करतात. – संपादक)