अभाविपच्‍या २० कार्यकर्त्‍यांविरुद्ध गुन्‍हा नोंद !

पुणे विद्यापिठाच्‍या आवारातील तोडफोड प्रकरण

पुणे विद्यापीठाची इमारत आणि तेथे झालेली तोडफोड (संग्रहित चित्र)

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्‍या आवारातील अवैध ‘रॅपसाँग’ चित्रीकरण, तसेच विविध मागण्‍यांच्‍या संदर्भात अभाविपच्‍या कार्यकर्त्‍यांनी २४ एप्रिल या दिवशी विद्यापिठाच्‍या आवारात घोषणा देऊन आंदोलन केले होते. त्‍यामुळे कार्यकर्त्‍यांनी तोडफोड करून गोंधळ घातल्‍याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या २० कार्यकर्त्‍यांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या प्रकरणी विद्यापिठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. अभाविपचे कार्यकर्ते गंगा महादेव, अनिल ठोंबरे, अंबादास अभिनवे, पवन पिनाटे यांच्‍यासह १५ ते २० कार्यकर्त्‍यांच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.