१ मेपासून विसावा मंडळाच्‍या ‘शिवोत्‍सव २०२३’ला प्रारंभ !

( संग्रहीत छायाचित्र )

सांगली, २५ एप्रिल (वार्ता.) – गेली ३६ वर्षे सातत्‍याने साजरा होणारा विसावा मंडळाचा शिवोत्‍सव १ मे या दिवशी प्रारंभ होत आहे. यंदा उत्‍सवाचे ३७ वे वर्षे असून १ मे या दिवशी सकाळी ६ ते ७ सनई चौघडा याच्‍या वादनानंतर सकाळी ७ ते ७.३० श्री सीताराम स्‍तोत्रपठण, तसेच सकाळी ७.३० ते ८.१५ या वेळेत श्री शिवछत्रपतींची आरती आणि महाप्रार्थना होणार आहे. या प्रसंगी ह.भ.प. दीपक केळकर महाराज यांची उपस्‍थिती लाभणार आहे. सायंकाळी ६.३० राजमाता जिजाऊ – भाग १ आणि २ मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राजमाता जिजाऊ भाग – २ यावर व्‍याख्‍यान होईल.

४ मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता नृसिंह जयंती कीर्तन होईल, तसेच ५ मे या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी अधिकाधिक नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्‍थित रहावे, असे आवाहन विसावा मंडळाचे अध्‍यक्ष श्री. संजय चव्‍हाण यांनी केले आहे.