गोवा : अडीच मासांत समुद्रकिनारी भागात रात्री ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या प्रतिदिन सरासरी १०० तक्रारी

एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन अडीच मासांत ध्वनीप्रदूषण रोखू न शकणे ही त्यांची अकार्यक्षमता म्हणायची ? हतबलता समजायची कि यात भ्रष्टाचार आहे, असे समजायचे ?

ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्‍यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.

उपकार्यकारी अभियंता आणि सनातन संस्थेचे साधक नीलेश नागरे यांनी कृषीपंप देयकांची १४ कोटींची केली विक्रमी वसुली !

सनातनचे साधक श्री. नीलेश नागरे यांनी स्वतः काही गावांमध्ये शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. त्यांनी शेतकर्‍यांना वीजदेयक भरण्याचे महत्त्व पटवून दिले. याचा परिपाक म्हणून मार्चमध्ये शेतीपंप ग्राहकांनी स्वयंप्रेरणेने वीजदेयकांचे ६८ लाख रुपये भरले !

‘सनातन प्रभात’ वाचूया !

‘सनातन प्रभात’मध्ये शब्दांना धार आहे, वजन आहे ।
धर्माचरणाचे ज्ञान आहे गुरुरूपे तो दिशादर्शक आहे ।। २ ।।

हिंदु धर्म संवर्धनाचे अलौकिक कार्य करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

‘जगात भारतासारखा देश नाही आणि हिंदु धर्मासारखा धर्म नाही’, याची जाणीव सर्वांनी ठेवूया आणि हिंदु राष्ट्र येण्यासाठी एक होऊया ! ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् ।’

गोवा : खोतीगाव, गावडोंगरी परिसरातील डोंगरांना आग !

गेल्या मासात म्हादई अभयारण्याला लागलेली आग थांबवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर आता खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील डोंगरांनाही आग लागली. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अध्यात्माविषयी रात्रंदिवस विरोधी बोलणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या विषयाचा आपला अभ्यास नसला, तर आपण त्याविषयी काही बोलत नाही; असे असले, तरी बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्म विषयाचा अभ्यास नसतांना आणि साधना केलेली नसतांना त्याबद्दल रात्रंदिवस विरोधी बोलतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील प्रबोधनानुसार आजपासून कृतीला आरंभ करा !

‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्‍या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे.

दंगली रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे धोरण केंद्र आणि सर्व राज्य सरकारे यांनी लागू करावे ! – समीर लोखंडे, उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

देशाचे तुकडे करण्यासाठी ‘मिनी (छोटी) पाकिस्तान’ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदूंनी हनुमानाप्रमाणे बलोपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला आत्मरक्षण करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्याचा उपयोग करावा.