उपकार्यकारी अभियंता आणि सनातन संस्थेचे साधक नीलेश नागरे यांनी कृषीपंप देयकांची १४ कोटींची केली विक्रमी वसुली !

निफाड उपविभाग नाशिक परिमंडळात अव्वल !

निफाड उपविभागात शेतीपंप वीज बिलांची विक्रमी वसुली !

नाशिक – जिल्ह्यातील निफाड उपविभागात कृषीपंपाची विक्रमी वसुली झाली आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून कृषीपंपांचे १४ कोटी रुपये वसूल झाल्याने निफाड उपविभाग नाशिक परिमंडळात अव्वल ठरला आहे. महावितरण आस्थापनाचे निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आणि सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक श्री. नीलेश नागरे (वय ४२ वर्षे) यांनी स्वतः काही गावांमध्ये शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांना वीजदेयक भरण्याचे महत्त्व पटवून दिले. याचा परिपाक म्हणून संपूर्ण मार्च मासामध्ये शेतीपंप ग्राहकांनी स्वयंप्रेरणेने वीजदेयकांचे ६८ लाख रुपये भरले आहेत.

निफाड उपविभागात शेतीपंप वीज बिलांची विक्रमी वसुली ! (व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा)

उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे म्हणाले,

‘‘निफाड उपविभागात कृषीपंपांचे थकित वीजदेयक वसुली भरण्यासाठी शेतकर्‍यांनी सहकार्य केले. तशीच इतर शेतकर्‍यांनीही त्यांची थकबाकी भरावी आणि महावितरण आस्थापनाला सहकार्य करावे. कृषीपंपांच्या थकित वीजेदेयक वसुलीसाठी मला सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.’’

प्रवचन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती !

श्री. नीलेश नागरे यांनी निफाड उपविभागात कृषी आणि इतर वीज देयके यांची वसुली करण्यासाठी नियोजन केले. यासाठी या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना वीजदेयक वसुलीसाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मार्च मास हा सर्व कार्यालयांसाठी वसुलीचा असल्याने महावितरणच्या निफाड उपविभागाद्वारेही सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी थकबाकी वसुली मोहीम राबवण्यात आली. घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि इतर, तसेच पाणीपुरवठा ग्राहक यांचा सतत पाठपुरावा केल्याने त्यांनी तर वीजदेयके भरलीच, त्याखेरीज उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निफाड उपविभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रसार, प्रबोधन आणि मार्गदर्शनपर माहिती देऊन शेतीपंपाच्या समस्त ग्राहकांमध्ये वीजदेयक भरण्याविषयी जनजागृती केली. वीजदेयक वसुलीसाठी पत्रिकेचे वाटप करणे, जनजागृती करणे, प्रवचन आणि कीर्तन यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करणे, यंत्रचालक उपकेंद्रातून ग्राहकांना दूरध्वनी करणे, योजनेची सविस्तर माहिती समजावून सांगणे, उद्घोषणा करणे, व्हॉट्सॲप गटात संदेश पाठवणे असे विविध उपक्रम या वसुलीसाठी राबवण्यात आले.

कृषीपंपांच्या वसुलीसाठी नाशिक परिमंडळ कार्यालयाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर आणि कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, जनमित्र कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी आणि यंत्रचालक यांनी परिश्रम घेतले.


तळमळीने कार्य करणारे श्री. नीलेश नागरे !

श्री. नीलेश नागरे

जून २०२१ मध्ये अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ अन् विश्वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१’ने सन्मानित करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या काळामध्ये त्यांनी नगर मंडळ कार्यालय आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालय यांच्या अंतर्गत ‘ऑनलाईन’ माध्यमातून ‘कोविड १९’ हा विषय घेऊन अभियंते, जनमित्र, बिलिंग स्टाफ, यंत्रचालक आणि आऊटसोर्स या सर्वांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण केली होती. श्रीरामपूरमध्ये थकबाकी वसुली करत असतांना श्री. नागरे यांनी पाणी पाजून काही चिमण्यांचे प्राण वाचवले होते. या दृष्टीने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. श्री. नीलेश नागरे यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्व श्रेय परमेश्वर, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच महावितरण आस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना दिले होते.

संपादकीय भूमिका

हिंदु राष्ट्रात नागरिक प्रामाणिक असल्याने ते स्वतःहून देयके भरतील !