दैनिक ‘सनातन प्रभात’च्या द्वितपपूर्ती म्हणजे २४ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश
‘वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः’ (यजुर्वेद अध्याय ९, ऋचा २३) अर्थात् ‘आम्ही पुरोहित राष्ट्राला जागृत करत राहू.’ यातील ‘पुरोहित’ शब्दाचा अर्थ आहे, ‘जो ‘पूर’ म्हणजे नगराचे हित साध्य करतो, तो पुरोहित !’ ‘सनातन प्रभात’ची हीच भूमिका आहे. ‘सनातन प्रभात’ आधुनिक काळातील पुरोहित असून तो सतत देशस्थ (देशात रहाणार्या) हिंदूंना जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली २ तपे म्हणजे २४ वर्षे अखंडपणे ‘सनातन प्रभात’ प्रतिदिन प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला धर्मबोध, राष्ट्रबोध आणि साधनाबोध देत आहे. या प्रबोधनानुसार आचरण केल्याने हिंदु समाजाचे आणि हिंदु राष्ट्राचे शुभकल्याण होणार आहे. यासाठी ‘सनातन प्रभात’च्या प्रबोधनानुसार आजपासून कृतीला आरंभ करा !
‘सनातन प्रभात’च्या दैनंदिन कार्यात गेली २४ वर्षे सक्रीय असलेले साधक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी श्री गुरुचरणी प्रार्थना !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह (४.४.२०२३)