ठाणे – ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ वर्धापन दिन आणि जेष्ठ साहित्यिक स्वर्गीय डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्गतर्फे दरवर्षी राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘लोक हिंद गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते.
आजच्या दैनिक अग्रलेख पेपरची बातमी=रिपोर्टर /अंकुश भोईर लोक हिंद गौरव पुरस्कार 2023 साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन pic.twitter.com/NdGpRgIFQi
— ANKUSH BHOIR PRESS (@Reporter_Ankush) February 25, 2023
यंदाचे पुरस्काराचे ६ वे वर्ष असून स्वर्गीय डॉ. दिलीप धानके यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अर्थात १४ मे २०२३ यादिवशी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. राज्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, उद्योग, आरोग्य, कामगार, प्रशासन, सहकार, आध्यत्मिक,अभिनय, नाट्य, साहित्य,कीर्तन, प्रबोधन यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती अथवा त्यांच्या प्रतिनिधींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मानपत्र, सन्मानचिन्ह, तुकाराम गाथा, शाल, श्रीफळ, मानाची पगडी, असे या पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी आपले प्रस्ताव दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत संपादक लोक हिंद चॅनेल, देशमुख वाडा, महाराष्ट्र बँकेच्या समोर, शहापूर जिल्हा ठाणे पिन ४२१६०१, भ्रमणभाष ९०४९०३७४४४ येथे पोस्टाने, कुरियरने अथवा प्रत्यक्ष पाठवावे, असे आवाहन पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश धानके, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष किसन बोन्द्रे, उपाध्यक्ष लक्ष्मण घरत, रामचंद्र जोशी, अंकुश भोईर यांनी केले आहे.