रत्नागिरी – अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचे हे स्वप्न आता सत्यात उतरेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता विलास पाटणे यांनी व्यक्त केली.
अधिवक्ता विलास पाटणे म्हणाले,
१. या वेळच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोकणवासियांना भरभरून दिले आहे.
२. रत्नागिरी ‘इकॉनॉमी पार्क’ चालू होत असल्याने ‘शीपब्रेकिंग युनिट उद्योग’ उभा राहून रोजगार वाढणार आहे.
३. शैवालशेती प्रोत्साहन योजना लाभदायक ठरणार आहे.
४. काजू प्रक्रिया उद्योगाला १ सहस्र ३४५ कोटी रुपये उपलब्ध झाल्याने काजू उद्योजक स्थिरावणार आहेत.
५. रायगडमधील रेवस, तर सिंधुदुर्गातील रेडी या ५४० किमी लांबीच्या सागरी महामार्गाच्या प्रावधानाचे स्वागत आहे. या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनविकास वाढेल.
६. पारंपरिक मासेमार व्यावसायिकांना ५ लाख रुपये विमा सुरक्षा मिळाली आहे.